News

शिरडी

शिर्डीतील युवकांना व्‍यसनापासुन परावृत्‍त करुन त्‍यांचे शरीर सुदृढ करण्‍यासाठी व क्रिडाक्षेत्रातील कला गुणांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेच्‍या वतीने अद्यावत व्‍यायामशाळा उभारणार असल्‍याचे प्रतिपादन संस्‍थानचे विश्‍वस्‍त सचिन तांबे यांनी व्‍यक्‍त केले.

राहाता येथे दिनांक १४ ऑक्‍टोंबर रोजी झालेल्‍या शरीरसौष्‍ठत्‍व स्‍पर्धा २०१६ मध्‍ये सर्व गटातुन प्रथम क्रमांक पटकावणारे अलिम तांबोळी, ६५ किलो वजन गटातुन प्रथम क्रमांक साईराम भालेराव, ६० किलो वजन गटातुन तृतीय क्रमांक संतोष वाव्‍हाळे आणि ५५ किलो वजन गटातुन तृतीय क्रमांक साईनाथ शिंदे व चतुर्थ क्रमांक पटकावणारे महेश तुरकणे या खेळाडुंचा व त्‍यांचे प्रशिक्षक महेश गोसावी यांचा संस्‍थानच्‍या वतीने विश्‍वस्‍त सचिन तांबे यांनी सत्‍कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, संरक्षण विभाग प्रमुख मधुकर गंगावणे व संरक्षण विभागाचे विलास कोते आदी उपस्थित होते. यावेळी श्री.तांबे बोलत होते‍.

श्री.तांबे म्‍हणाले, श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीची सध्‍या असलेल्‍या व्‍यायाम शाळेचा उपयोग अनेकांना होत आहे. मात्र याठिकाणचे साहित्‍य अद्यावत होणे गरजेचे आहे. या करता या व्‍यायामशाळेतील साहित्‍यामध्‍ये लवकरच अद्यावत असे साहित्‍य उपलब्‍ध करुन ही व्‍यायामशाळा आदर्शवत करण्‍याचा संस्‍थानचा प्रयत्‍न आहे. यासाठी व्‍यवस्‍थापन मंडळाच्‍या सभेत प्रस्‍ताव सादर करणेबाबत संबंधीत विभागास कळविण्‍यात आले आहेत असेही श्री.तांबे म्‍हणाले.

 

शिरडी

    श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍यावतीने प्रकाशित होणारे सर्व प्रकाशन साहित्‍य २० टक्‍के सवलतीच्‍या दरात साईभक्‍तांना उपलब्‍ध करुन देणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष सुरेश हावरे यांनी दिली.  

    श्री साईबाबा संस्‍थान प्रकाशित सन २०१७ श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा नुकताच संस्‍थानचे अध्‍यक्ष सुरेश हावरे, विश्‍वस्‍त सचिन तांबे, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा सौ.अनिताताई जगताप, कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे, उपकार्यकारी अधिकारी डॉ.संदीप आहेर व मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब‍ घोरपडे आदीच्‍या उपस्थितीत पारपडला.

याप्रसंगी संस्‍थानचे अध्‍यक्ष सुरेश हावरे म्‍हणाले, यावर्षी श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिकेची साईभक्‍तांची मागणी लक्षात घेवुन दिवाळीत २० टक्‍के सवलतीच्‍या दरामध्‍ये श्री साई दैनंदिनी ही रुपये ५५ व दिनदर्शिका रुपये १५ या किंमतीत साईभक्‍तांना विक्री करता उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. यावर्षी संस्‍थानच्‍या वतीने २ लाख ५० हजार श्री साई दै‍नंदिनी व ३ लाख २५ हजार दिनदर्शिका प्रकाशित  करण्‍यात आलेल्‍या आहेत.

    तरी जास्‍तीत-जास्‍त साईभक्‍तांनी संस्‍थानच्‍या या प्रकाशन साहित्‍यांचा लाभ घ्‍यावा असे आवाहनही संस्‍थानचे अध्‍यक्ष सुरेश हावरे यांनी केले आहे.  

सोबत प्रकाशन करतानाचा फोटो पाठविला आहे.  

 

 

BACK