शिर्डीः-

    श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने शुक्रवार दिनांक २९ सप्‍टेंबर २०१७ ते सोमवार दिनांक ०२ ऑक्‍टोंबर २०१७ या काळात ९९ वा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा करण्‍यात येणार असून साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून दि.२९ सप्‍टेंबर व दि.३० सप्‍टेंबर २०१७ रोजी (दोन दिवस) समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार असल्‍याचे सांगुन साईभक्‍तांनी या उत्‍सवात मोठ्या संख्‍येने सहभागी होवून उत्‍सवाची शोभा वाढवावी असे आवाहनही संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले.

     श्रीमती अग्रवाल म्‍हणाल्‍या,  यापुर्वी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशीच समाधी मंदिर उघडे ठेवण्‍यात येत होते. परंतु साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून उत्‍सवाच्‍या प्रथम व मुख्‍य दिवशी असे दोन दिवस समाधी मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे दि.२९ संप्‍टेबर रोजी नित्‍याची शेजारती व दिनांक ३० सप्‍टेंबर रोजी पहाटेची काकड आरती, रात्रौ १०.३० वाजता होणारी शेजारती आणि दि.०१ ऑक्टोंबर रोजी पहाटेची काकड आरती होणार नाही.

     उत्‍सवाचे प्रथम दिवशी शुक्रवार दिनांक २९ सप्‍टेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणुक, पहाटे ५.१५ वाजता व्‍दारकामाईत श्री साईसच्‍चरिताचे अखंड पारायण, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान व नंतर दर्शन, दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिराचे शेजारील स्‍टेजवर होणार आहे. सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होणार आहे. रात्रौ ७.३० ते १०.३० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम साईनगर मैदानावरील स्‍टेजवर होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक होणार आहे. उत्‍सवाचा हा पहिला दिवस असल्‍यामुळे अखंड पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर व समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील.

     शनिवार, दिनांक ३० सप्‍टेंबर हा उत्‍सवाचा मुख्‍य दिवस आहे. या दिवशी पहाटे ५.०० वाजता अखंड पारायण समाप्‍ती व श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ५.१५ वाजता श्रींचे मंगल स्‍नान व नंतर दर्शन, सकाळी ९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होवून सकाळी १०.३० वाजता आराधना विधी व दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद तर सायंकाळी ५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन व मिरवणूक कार्यक्रम, सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम साईनगर मैदानावरील स्‍टेजवर होणार असून रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्‍या रथाची गावातून मिरवणूक काढण्‍यात येईल. उत्‍सवाचा हा मुख्‍य दिवस असल्‍याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. तर रात्रौ ११.०० ते पहाटे ५.०० यावेळेत श्रींचे समोर कलाकारांची हजेरी कार्यक्रम होईल.

     रविवार, दिनांक ०१ ऑक्टोंबर उत्‍सवाच्‍या तृतिय दिवशी सकाळी ५.०५ वाजता श्रींचे मंगल स्‍नान व नंतर दर्शन सकाळी ६.३० वाजता समाधी शताब्‍दी शुभारंभ निमित्‍त शोभा यात्रा काढण्‍यात येवून सकाळी १०.०० वाजता ध्‍वजारोहण व समाधी शताब्‍दी उदघाटन कार्यक्रम, दुपारी १२.१० वाजता माध्‍यान्‍ह आरती तीर्थप्रसाद, सायं. ४.०० वाजता कीर्तन कार्यक्रम व सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम साईनगर मैदानावरील स्‍टेजवर होणार रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.

     उत्‍सवाच्‍या सांगता दिवशी सोमवार, दिनांक ०२ ऑक्‍टोंबर रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, ५.०५ वाजता श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, सकाळी ६.४५ वाजता गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक होईल. सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजता माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्रौ ७.३० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम साईनगर मैदानावरील स्‍टेजवर होणार     असून रात्रौ १०.३० वाजता शेजारती होईल. उत्‍सवाच्‍या कालावधीत श्री साई सत्‍यव्रत पुजा (सत्‍यनारायण पूजा) व अभिषेक पूजा नित्‍याप्रमाणे चालू ठेवण्‍यात येणार असल्‍याचे श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.

             हा उत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम व सर्व विश्‍वस्‍त, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम आणि मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी डॉ.संदीप आहेर यांच्‍या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्‍नशिल आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महोदय,

वरील बातमी आपले दैनिकात/मासिकात/साप्‍ताहीकात/दुरचित्रवाहीनीवर प्रसिध्‍द करणेस नम्र विनंती आहे.

       कळावेश्री साईबाबांच्‍या शुभाशिर्वादासह.

    मोहन यादव

         जनसंपर्क अधिकारी

 

Shirdi:

            The 99th Samadhi Anniversary of Shri Sai Baba will be celebrated on behalf of the Shri Sai Baba Sansthan Trust (Shirdi), between 29thSeptember 2017 and 02 October 2017. Considering the possibility of huge crowds of devotees during this period Shri Sai Samadhi Temple will be kept open for the whole night on the 29th September and 30th September 2017 (two days). Shrimati Rubal Agrawal, Chief Executive Officer of the Sansthan has appealed to Sai devotees to participate in in large numbers at these celebrations.

              Shrimati Agrawal said that earlier the temple used to be kept open only on the main day of celebrations. However considering the possible huge crowds of devotees, the Samadhi temple will be kept open for two days that is the first day as well as the main day. Due to this the usual Shej Arati on the 29th September, early morning Kakad Arati and Shej Arati at 10.30 p.m. on the 30th September as well as early morning Kakad Arati on the 01st October will not be held. 

            On the first day of the celebrations on the 29th September, there will be Kakad Arati at 4.30 a.m., procession of Shri Sai Photo and Pothi at5.00 a.m., Continuous recitation of Shri Sai Sachharita at Dwarakamai at 5.15 a.m., auspicious bath for Shri Sai at 5.20 a.m. followed by Darshan,Noon Arati at 12.30 p.m. and Teerth-prasad, keertan program between 4 and 6 p.m. at stage near Samadhi temple, Dhoop Arati at 6.15 p.m., Invited artists will perform at Sainagar stage between 7.30 and 10.30 p.m. Palanquin procession in the city will be held at 9.15 p.m. As this would be the first day of the celebrations Dwarakamai will be open for continuous recitation and Samadhi Temple will be open for Darshan for the entire night. 

            Saturday, 30th September is main day of the celebrations. At 5 a.m. on this day Continuous recitation will end and procession of Shri Sai Photo and Pothi will be taken out. Auspicious bath of Shri Sai at 5.15 a.m. will be followed by Darshan. Bhiksha Jholi Program will be held at 9 a.m. Keertan program at 10 a.m. will be followed by Aradhana rituals at 10.30 a.m. Noon arati and Teertha-prasad will be at 12.30 Noon. Seemollanghan program will be held at Khandoba Temple at 5 p.m. followed by a procession. Dhoop Arati will be held at 6.15 p.m. Invited artists will perform at Sainagar stage between 7.30 and 10.30 p.m. The Shri Sai Chariot will be carried in a procession through the city at 9.15 p.m. With the main day of celebrations the Samadhi Temple will be kept open for the whole night for Darshan. Artists will be performing in front of Shri Sai between 11 p.m. and 5 a.m.    

            Sunday the 01st October would be the third day of the celebrations. Ausipicious bath of Shri Sai will be held at 5.05 followed by Darshan, There will be a tableau on the occasion of starting of Samadhi Centenary Celebrations at 6.30 a.m. There will be Flag hoisting at 10 a.m.Noonarati at 12.30 noon with Teerth-prasad, keertan program at 4 p.m. and Dhoop Arati at 6.15 p.m. Invited artists will perform at Sainagar stage between 7.30 and 10 p.m. Shej Arati will be held at 10.30 p.m.   

On the concluding day 02nd October 2017 for the celebrations, Kakad arati will be held at 4.30 a.m., auspicious bath of Shri Sai at 5.05 a.mfollowed by Darshan. Rudrabhishek will be held at gurusthan Temple at 6.45 a.m. Gopalkala and Dahihandi program will be held at 10 a.m. withnoon arati and Teerth-prasad at 12.30 Noon. Dhoop Arati will be held at 6.15 p.m. Invited artists will perform at Sainagar stage between 7.30 and 10 p.m. Shej Arati will be held at 10.30 p.m. Shrimati Agrawal said that during the celebrations period, the Sai Satyavrat Pooja (Satyanarayan Pooja) and Abhishek Pooja will continue as usual.

            In order to carry out the celebrations successfully, all the administrative officers, heads of the departments and staff are making efforts under the guidance of Sansthan Chairman Dr. Suresh Haware, Vice Chairman Chandrashekhar Kadam and all Trustees, Chief Executive officer Shrimati Rubal Agrawal, Deputy Collector Dhananjay Nikam and Manoj Ghode Patil and Dy. Executive Officer Dr. Sandeep Aher.

 

शिरडी

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने जागतिक वर्ल्ड ट्रायलथॉन कार्पोरेशन विची फ्रांस आयोजित द आयर्नमॅन ट्रायलथॉन स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळविल्याबद्दल राज्‍याचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री.कृष्णप्रकाश यांचा संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

जागतिक वर्ल्ड ट्रायलथॉन कार्पोरेशन विची फ्रांस आयोजित द आयर्नमॅन ट्रायलथॉन ही स्पर्धा जागतिक स्तरावर लोकप्रिय व आव्हानात्मक आहे, यात ३.८६ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर धावावे लागते तेही १६ तासात. यामुळेच  द आयर्नमॅन ट्रायलथॉन स्पर्धा ही जगभरातील क्रीडाप्रेमींना व खेळाडूंना खुणावत असते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रथम पात्रता फेरीत यश मिळवावे लागते. 

श्री.कृष्णप्रकाश यांनी हे तिन्ही प्रकार १४ तास ८ मिनिटे 23 सेकंदात पूर्ण केले. त्यांचे हे यश युवकांसाठी कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. कारण गेली ६ महिने प्रत्येक रविवारी श्री.कृष्णप्रकाश पुणे ते मुंबई हे अंतर सायकलने ६ तासात पूर्ण करीत असत. दररोज सकाळी पहाटे ४ वाजता महालक्ष्मी रेसकोर्सवर २० किलोमीटर धावण्याचा ते नियमित सराव करीत. या स्पर्धेत केवळ सहभागी व्हायचे नाही तर अखंड परिश्रम घेऊन यात विक्रमी वेळेत यश प्राप्त करायचेच हे त्यांचे ध्येय होते. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली. भारतीय सनदी सेवेतून आयर्नमॅन स्पर्धेत यश प्राप्त केलेले ते एकमेव अधिकारी आहेत. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांनी हे यश मिळविले आहे . एक कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी म्हणून राज्‍यात श्री.कृष्णप्रकाश यांना ओळखले जाते. बुलढाणा, मालेगांव, अहमदनगर, सांगली, मुंबई, पुणे येथे यांनी बजावलेली सेवा आजही तेथील नागरिक अभिमानाने सांगतात. 

याप्रसंगी संरक्षण अधिकारी मधुकर गंगावने तसेच मंदीर प्रमुख राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

BACK