श्री साई पालखी सोहळा

 

सर्व पालखी मंडळ यांना सुचित करणेत येते की, दिनांक २८.०५.२०१७ रोजी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी यांचेमार्फत सिद्ध संकल्‍प मॅरेज हॉल, नगर मनमाड रोड, साकुरी, ता.राहाता, जि.अहमदनगर येथे श्री साई पालखी प्रतिनिधींचे संमेलन आयोजित केलेले आहे. संस्‍थानचे वतीने सर्व पालख्‍यांची नोंदणी करण्‍यात आलेली आहे. नोंदणी झालेल्‍या १०२८ पालख्‍यांची यादी सोबत जोडलेली आहे. आपले पालखीचे नाव सोबतचे यादीमध्‍ये समाविष्‍ट असलेबाबत पडताळणी करावी. यादीमध्‍ये नाव नसल्‍यास दि.३०.०४.२०१७ पर्यंत आपण खाली दिलेल्‍या फोन नंबरवर संपर्क साधुन पालखीची नाव नोंदणी करावी. सोबत पालखी नोंदणीसाठी फॉर्म दिलेला आहे. सदरचा फॉर्म भरुन मा.कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर यांचेकडे "श्री साई पालखी प्रतिनिधी संमेलन" या नावाने पाठवावा. यादीमध्‍ये नाव असलेल्‍या पालखी आयोजकांना फॉर्म पोष्‍टाने पाठविण्‍यात आलेले आहेत.

संबंधितांनी आपले रजिष्‍ट्रेशन/नाव नोंदणी फॉर्म संस्‍थानकडे दिनांक १५.०५.२०१७ पर्यंत सादर करणे आवश्‍यक आहे व एक फॉर्म संमेलनास येतांना स्‍वत: बरोबर घेऊन येणे आवश्‍यक आहे.  

संपर्क : श्री योगेश गोरक्ष, संरक्षण विभाग ०२४२३-२५८८८५ मो.नं.९९७०२३५००७ / ९०४९७२७२१५

श्री साई पालखी यादी

श्री साई पालखी नोंदणी अर्ज